Breaking news

भांगरवाडीत श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त तीन दिवसीय सांघिक पारायण सोहळा

लोणावळा: श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवार, लोणावळा यांच्या वतीने कै. तानाजी शेडगे चाळ, कलावती आई मंदिरामागे, भांगरवाडी, लोणावळा येथे 28 मार्च ते 31 मार्च दरम्यान भव्य तीन दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृत सांघिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप:

 28 मार्च (शुक्रवार):

  • संध्याकाळी 7:30 वाजता "भागीरथी भजनी मंडळ, संतनगर पुणे" यांच्या सुमधुर भजन संध्येचे आयोजन.
  • त्यानंतर महाप्रसाद वितरण.

 29 मार्च (शनिवार):

  • दुपारी 1 ते 3 दरम्यान श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांच्या अन्नछत्रातील पालखी पादुकांचे आगमन.
  • संध्याकाळी 7:00 वाजता ह.भ.प. श्री धर्मराज महाराज हांडे (शिवव्याख्याते) यांचे प्रबोधनपर कीर्तन.
  • नवमी भजनी मंडळ, भांगरवाडी यांचे साथसंगत.

 30 मार्च (रविवार - गुढीपाडवा):

  • संध्याकाळी 5:00 ते 6:00 दरम्यान श्री सद्गुरू चिले महाराजांच्या समाधी मठातील पादुकांचे आगमन आणि पालखी सोहळा (श्री राम मंदिर ते श्रींचा मठ).
  • संध्याकाळी 7:00 वाजता ह.भ.प. श्री शालिकराम महाराज खंदारे यांचे कीर्तन सेवा.
  • विठल रखुमाई भजनी मंडळ, दहिवली यांचे साथसंगत.

 31 मार्च (सोमवार):

  • दुपारी 2:00 ते 4:00 दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिर (विशेषतः संधिवात, सांधेदुखी आणि हाडांचे आजार).
  • संध्याकाळी 7:00 वाजता ह.भ.प. वैशालीताई खोले यांची प्रवचन सेवा.

 दररोज रात्री 9:00 वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाविकांनी या पवित्र सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपाशीर्वाद लाभावेत, असे आवाहन श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवार, लोणावळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.


इतर बातम्या