Breaking news

क्रिकेटचा थरार । मावळात MTPL चा पहिला सामना सोमवारी KT स्पोर्टस विरुद्ध परेश बडेकर स्पोर्टस फाऊंडेशन यांच्यात रंगणार

लोणावळा : मावळ तालुक्यातील बहुचर्चित व बहुप्रतीक्षित असलेल्या मावळ तालुका प्रीमियर लीग टी-20 या स्पर्धेचा पहिला सामना सोमवारी (29 मे) रोजी सकाळी 7 वाजता मुंढवरे येथील दर्जेदार अशा SPJ ग्राऊंडवर खेळविला जाणार आहे. मावळ तालुक्यातील कसदार सहा संघ या स्पर्धेत आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहेत. अतिशय किर्तीवंत खेळाडू स्पर्धेत पहायला मिळणार असून मागील दोन महिन्यांपासून या स्पर्धेची तयारी व खेळाचा सराव विविध ठिकाणी सुरु होता. देशात सुरु असलेल्या IPL या स्पर्धेच्या धर्तीवर मावळ तालुक्यात ही स्पर्धा खेळवली जात असून स्पर्धेचे हे 9 वे पर्व आहे.

     अंडर 19 चा विश्व विजेता विकी ओत्सवाल व मावळातील मास्टर माईंड कर्णधार सागर चौधरी यांचा संघ KT स्पोर्ट्स विरुद्ध मावळ तालुक्यातील टॉप फिरकीपटू अमित सोनवणे व सुप्रसिद्ध खेळाडू अश्विन नराळे यांच्यात हा आकर्षक सामना मावळ वासियांना पाहायला मिळणार आहे. केटी स्पोर्ट्स विरुद्ध परेश बडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन असा हा सामना रंगणार आहे. तरीही सर्व क्रिकेट प्रेमींनी आपल्या आवडत्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी SPG ग्राउंड वर उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. मावळ माझा न्युज, आपला मावळ न्युज, आवाज न्युज हे या स्पर्धेचे मिडिया व स्टिमर पार्टनर असल्याचे संयोजक सागर चौधरी यांनी सांगितले.

इतर बातम्या