Breaking news

महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुका अध्यक्षपदी ॲड. अभिजीत जांभुळकर

लोणावळा : महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुका अध्यक्षपदी ॲड. अभिजीत जांभुळकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. 

      ॲड. जांभुळकर हे मागील 18 वर्षापासून विधी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक व कायदेविषयक कार्याची दखल घेत राज्य अध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष ॲड. यशवंत खराडे, सचिव ॲड. प्रवीण नलावडे, प्रवक्ता ॲड. अतिश लांडगे यांनी सदरची नियुक्ती घोषित केली आहे. सदर नियुक्तीचे प्रमाणपत्र महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश सदस्य ॲड. दिनकर बारणे, ॲड. शंकरराव वानखेडे, ॲड. वैभव कर्वे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मयूर लोढा, ॲड. सचिन नवले, ॲड. गणेश जगताप, ॲड. प्रताप मेरुकर, ॲड. योगेश थंबा, ॲड. गुरुप्रसाद शिवीलकर, ॲड. तेजस्विनी परमाने पवार आदी उपस्थित होते.

इतर बातम्या