पवना धरणातून 1600 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ माझा न्युज नेटवर्क : पवना धरणात जोरदार पावसामुळे जलसाठा झपाट्याने वाढत असून, धरण सध्या 75.69% भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर येवा (पाण्याचा आलेख) होत आहे. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सांडव्याद्वारे नदीपात्रात ८०० क्युसेक्स दराने विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामध्ये दुपारी 2.30 वाजता वाढ करत तो 1600 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. येत्या काळात पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.
नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना :
पवना नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीजवळ असलेली शेतीची अवजारे, मोटारी, जनावरे इत्यादी तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. जलसंपदा विभाग आणि प्रशासनाने सर्व नागरिकांना योग्य ती दक्षता घेण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.