Pawna Dam Update l पवना धरण परिसरात रविवारी 24 तासात 63 मिमी पावसाची नोंद; धरणात 77.28 टक्के पाणीसाठा

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळातील (Maval Taluka) महत्वाचे धरण म्हणून ओळख असलेल्या पवना धरणात (Pawna Dam) 77.28 टक्के पाणीसाठा झाला आहे. रविवारी 6 जुलै रोजी 24 तासात धरण परिसरात 63 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. मावळ तालुक्यात व विशेषतः लोणावळा व घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला पवना धरणात जेमतेम 20.99 टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात 56.29 टक्के जादा पाणीसाठा झाला आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने धरणातून 2600 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या अंदाजानुसार त्यात कमी अधिक बदल करण्यात येईल असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच पर्यटकांनी देखील नदी पात्रात उतरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.