Breaking news

पवना धरणात 76 टक्के पाणीसाठा ! रात्री 11 नंतर 2800 क्युसेक्स वेगाने होणार पाण्याचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ माझा न्युज नेटवर्क : लोणावळा व मावळ घाटमाथा परिसरामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. मावळ तालुक्यातील पवना धरणामध्ये 76.22% पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचे प्रमाण व धरणातील साठा याचा समतोल राखण्यासाठी धरणांमधून पाण्याचा विसर्ग कालपासून सुरू करण्यात आला आहे. आज दुपारी त्यामध्ये वाढ करत तो 1800 क्युसेक्स  करण्यात आला होता. मात्र पावसाचे प्रमाण व धरणात येत असलेल्या पाण्याचा येवा लक्षात घेता रात्री अकरानंतर यामध्ये वाढ करत तो 2800 क्युसेक्स करण्यात येणार असल्याची माहिती पवना पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असल्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत देखील वाढ होणार आहे याकरिता नागरिकांनी सतर्क करावी व नदीपात्रात व नदीपात्र परिसरामध्ये जाण्याचे टाळावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना :

पवना नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीजवळ असलेली शेतीची अवजारे, मोटारी, जनावरे इत्यादी तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. जलसंपदा विभाग आणि प्रशासनाने सर्व नागरिकांना योग्य ती दक्षता घेण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


इतर बातम्या