Breaking news

Ekvira Water Fall l कार्ला लेणीच्या डोंगरावरून वाहणारा धबधबा पाहण्यासाठी गडावर पर्यटक व भाविकांची गर्दी

लोणावळा : लोणावळा परिसरात मागील तीन चार दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे डोंगर भागातून वाहणारे धबधबे आता पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत. लोणावळा खंडाळा व भाजे परिसरातील धबधब्याप्रमाणे कार्ला लेणीचा डोंगरावरून वाहणारा धबधबा देखील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. कार्ला परिसरात आल्यानंतर भाविक व पर्यटक यांना कुलस्वामिनी आई एकवीरा देवीचे दर्शन व सोबतच हा धबधबा पाहण्याचा देखील आनंद घेता येत आहे. रविवारी हा धबधबा पाहण्यासाठी भाविकांनी व पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

कार्ला मळवली पर्यायी रस्ता सुरू पण वाहन चालकांनी काळजी घ्यावी

रविवारी रात्री पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी ओसरला असल्याने कार्ला मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवर तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता आता पाण्यातून बाहेर आला आहे. सकाळच्या सत्रात स्कूल व्हॅन या ठिकाणाहून सोडण्यात आल्या होत्या. गावातील काही युवकांनी पाण्याच्या प्रवाहासोबत पुलावर वाहून आलेली जलपर्णी काढून टाकली आहे.


इतर बातम्या