Breaking news

Breaking News l दुधीवरे खिंड येथे कंटेनर बंद पडल्याने लोणावळा पवनानगर वाहतूक बंद

लोणावळा : लोणावळा पवनानगर मार्गावरील दुधीवरे खिंडीजवळ चढणीवर एक मोठा कंटेनर रस्त्यात बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सदरचा कंटेनर हा संपूर्ण रस्त्यावर असल्याने दुचाकी गाडी देखील या ठिकाणाहून जाऊ शकत नाही. सकाळच्या सुमारास हा रस्ता बंद झाल्याने लोणावळ्यात येणारे कामगार व दुग्ध व्यवसायिक यांचे मोठे हाल झाले आहेत. सदरचा कंटेनर मोठा असल्याने त्याला बाजूला ओढण्यासाठी क्रेन देखील मोठीच लागणार आहे. सुदैवाने आज रविवार मुळे शाळांना सुट्टी आहे. अन्यथा शाळकरी मुलांचे मोठे हाल झाले असते. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशी व नागरिक यांनी संताप व्यक्त केला आहे.

      लोणावळा पवनानगर हा रस्ता सतत वर्दळीचा रस्ता आहे. पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्यात येणारे शेकडो पर्यटक याच मार्गाने पवनानगर धरणाकडे जात असतात. स्थानिक नागरिक व पर्यटक यांच्या वाहतुकीचा विचार करत सदरचा कंटेनर तात्काळ बाजूला करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत सदरचा कंटेनर बाजूला करत साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरू केली आहे.

इतर बातम्या