Breaking news

Bhushi Dam Overflow l पर्यटकांसाठी आनंदाची बातमी l लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झाले…

बातम्यांच्या अपडेट्स साठी what's app ग्रुप जॉईन करा

लोणावळा : लोणावळा भागातील स्थानिक व्यवसायिक व पर्यटक मागील महिनाभरापासून जो भुशी धरण ओव्हर फ्लो होण्याची वाट पहात होते, तो क्षण आज आला. लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी व आज रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. 

बातम्यांच्या अपडेट्स साठी what's app ग्रुप जॉईन करा

      पावसाळी पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरातील भुशी धरणावरील वर्षाविहार हा पर्यटकांचा आनंदाचा व आकर्षणाचा विषय असतो. मागील काही दिवसांपासून स्थानिक नागरीक व पर्यटक लोणावळ्यातील भुशी धरण फुल्ल होण्याची वाट पहात होते. धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहू लागल्याने स्थानिक विक्रेत्यांनी जल्लोष केला तसेच पर्यटकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

इतर बातम्या