Breaking news

Lonavala l धुक्यात हरवला लोणावळा

लोणावळा : लोणावळ्यात आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सर्वदूर धुक्याची चादर पसरली आहे. पावसाचा जोर कमी होतच संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पसरली आहे. दाट धुके पसरल्याने काही अंतरावरील देखील दिसेनासे झाले होते. वारा देखील मोठ्या प्रमाणात वहात आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने राष्ट्रीय महामार्गावर व द्रुतगती मार्गावरील वाहनांचा वेग मंदावला आहे. वाहन चालकांनी वाहने चालवताना काळजी घ्यावी.

इतर बातम्या