Breaking news

OKINAWA E BIKE : लोणावळा शहरात सर्वाधिक विकली जाणारी ई बाईक म्हणजेच "ओकिनवा इलेक्ट्रिक बाईक" आता ग्राहकांसाठी घेऊन येत आहे खास ऑफर

लोणावळा : भारतामध्ये सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक बाईक म्हणून गौरविली गेलेली Okinawa Praise Pro Electric बाईक आता लोणावळ्यातील सर्वाधिक खपाची ई बाईक बनली आहे. अतिशय सुंदर व आकर्षक रंगांमध्ये आता ही बाईक उपलब्ध झाली आहे. वलवण गावातील मोटो प्लेस या शोरुम मधून ओकिनवा ई बाईक खरेदी करणार्‍या ग्राहकांना गाडीचा पाच वर्षाचा इन्शुअरन्स मोफत दिला जाणार आहे. अक्षयतृतीयेच्या मुर्हतावर खास ग्राहकांसाठी ही ऑफर देण्यात आली आहे. 100 किमी प्रती चार्ज चालणारी ओकिनवा इलेक्ट्रिक बाईक आता फक्त 500 रुपये डाऊन पेमेंट भरुन तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. 

      लोणावळ्यातील वलवण गावात मोटो प्लेस या दालनात सदर बाईक उपलब्ध आहेत. बाईक आता नविन आकर्षक रंगात उपलब्ध आहेत. मोटो प्लेस शोरुमचे दुर्वेश जगदाळे याविषयी बोलताना म्हणाले, ओकिनवा ही देशात सर्वाधिक विकली जाणारी ई बाईक आहे. 2 लाख 50 हजार ग्राहकांनी ही बाईक खरेदी केली आहे. नुकताच देशभरात विक्री होणार्‍या बाईकचा सर्व्हे झाला. यामध्ये पहिला दहा बाईकमध्ये फक्त अन फक्त ओकिनवा या ई बाईकचा समावेश आहे. लोणावळ्यात ही बाईक सर्वाधिक विकली जात असून आमच्या ग्राहकांचे समाधान हेच आमचे यश आहे. सदर गाडी चालविण्याचा खर्च अत्यल्प आहे. एका चार्जमध्ये गाडी तब्बल 100 किमी चालते. पेट्रोलच्या भावात सांगायचे झाले तर किमान 200 रुपयांचा खर्च एका चार्जमध्ये (17 रुपयात) भागतो अशी ही आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना परवडणारी ई बाईक आहे. लोणावळ्यातील तिन्ही ऋतुंमध्ये तीचा फरफाॅर्म्स नागरिकांनी अनुभवला आहे.  

     यामुळे ई बाईक घेण्याचा विचार करत असाल तर कुठे जायचे याचा विचार न करता आता थेट लोणावळा शहरातील वलवण गावात मोटो प्लेस या ओकिनवा कंपनीच्या बाईक विक्रीच्या शोरुमला भेट द्या व आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या (व्हेरीयंट) गाडया पाहण्याचा व विकत घेण्याचा आनंद घ्या. ओकिनवा बाईक ही भारतीय बनावटीची बाईक असून ओकिनवा हे ई बाईक मधील अग्रगण्य नाव आहे. 

     मोटो प्लेस या दुकानाचे प्रमुख दुर्वेश जगदाळे म्हणाले, या बाईकची बॅटरी 2.5 तासात पुर्ण चार्ज होते. आपल्या घरगुती कनेक्शन वर बॅटरी चार्ज करता येते, याकरिता कोठेही रांगा लावायची गरज नाही. बस फक्त गाडीची बॅटरी चार्ज करा व फिरा दिवसभर कोठेही असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे गाडीच्या बॅटरीसाठी 3 वर्षांची वाॅरंटी देखील देण्यात आली आहे. लोणावळा वलवण येथील मोटो प्लेस या दुकानामध्ये 500 रुपये डाऊनपेमेंटवर सदरची गाडी उपलब्ध आहे. कमीत कमी कागदपत्रं व त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याने ग्राहकांचे आपल्या घरी ई बाईक आणण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे. लोणावळ्यात सदरचे शोरुम झाल्याने ई बाईक घेण्यासाठी आता पुणे, पिंपरी अथवा मुंबई या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. आपल्या शहरात आता या ई बाईक उपलब्ध असल्याने लोणावळा व परिसरातील नागरिकांनी शोरुमला नक्की भेट देऊन ई बाईक खरेदी करण्याचा आनंद घ्यावा. अधिक माहितीसाठी 8793587858/ 9503436332 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मोटो प्लेसचे दुर्वेश जगदाळे यांनी केले आहे.

इतर बातम्या