Blood Donation Camp l कैवल्यधाम योग महाविद्यालयाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 90 रक्तदात्यांनी घेतला सहभाग

लोणावळा : जागतिक योग संस्था अशी ओळख असलेल्या लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेच्या वशिष्ठ सभागृहामध्ये आज राष्ट्रीय सेवेअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गोवर्धनदास सेक्सेरिया योग महाविद्यालय, सांस्कृतिक समन्वय कैवल्यधाम, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक व इंडियन रेड क्रॉस सोसायटी लोणावळा यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल 90 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तर 56 जणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले आहे.
गोवर्धनदास सक्सेरिया योग महाविद्यालय कैवल्यधाम, लोणावळा च्या प्राचार्या डॉ. बंदिता सतपते, डॉ. गुरुराज, लोणावळ्यातील डॉ. सचिन भिसे, डॉ. अमोल रानडे, डॉ शैलेश शहा, डॉ. विकास नय्यर डॉ. दिनमित्र माने, मनशक्ती, लोणावळा चे डॉ. सुहास गोसावी तसेच श्रद्धा ब्लड स्टोरेज सेंटर, लोणावळा चे तंत्रज्ञ यांच्या शुभ हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता करण्यात आले. या शिबिरामध्ये कैवल्यधाम संस्थेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग योग महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील नागरिक यांनी सहभाग घेतला होता. शिबिराच्या समन्वयक म्हणून श्रीमती रागिनी गुप्ता यांनी काम पाहिले.