Breaking news

Lonavala News l भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त जैन नारी शक्तीच्या वतीने बाईक रॅली व महावीर की रोटी वार्षिक उपक्रमाला सुरुवात

लोणावळा : भगवान महावीर जन्म कल्याण निमित्त लोणावळ्यामध्ये जैन नारी शक्ती यांच्यातर्फे महिलांची बाईक रॅली काढण्यात आली होती. भगवान महावीरांचा जयघोष करत जैन स्थानक पासून सुरुवात करून जैन मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मावळी पुतळा व पुढे भगवान महावीर स्वामी चौक ला प्रदक्षिणा करून रॅली परत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. त्या ठिकाणी भगवान महावीरांचा जयघोष करत रॅलीची समारोप झाला. या रॅलीसाठी जैन नारी शक्तीच्या संस्थापक अध्यक्ष मनीषा चेतनकुमार बंबोरी तसेच सोनल ओसवाल, सपना संचेती, नीलम ओसवाल, श्रीमती साधना टाटिया, गुड्डी ओसवाल, अमृता लुनावत आणि समाजातील सर्व महिलांनी अनमोल सहकार्य केले.

       जैन नारीशक्ती यांच्यातर्फे भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त आज पासून रोज शंभर लोकांसाठी जैन भाजी आणि 2 चपाती यांचे वाटप रोज सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात येणार आहे. पुढील 365 दिवस हा उपक्रम कायम ठेवण्यात येणार आहे. महावीर की रोटी असे कार्यक्रमाचे नाव आहे. त्याचे उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात झाले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत साधना टाटिया यांनी केले आणि वर्षभराची कार्यक्रमाची रूपरेषा जैन नारीशक्ती च्या संस्थापक अध्यक्षा मनीषा बंबोरी यांनी सांगितली. जैन नारी शक्तीच्या सर्व सभासद यावेळी उपस्थित होत्या. नीलम ओसवाल, गुड्डी ओसवाल, सपना संचेती, सविता भुरट आदींनी कार्यक्रम संपन्न होण्यासाठी मोलाचा हातभार लावला.

इतर बातम्या