Breaking news

PTS खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांना वैद्यकीय प्रथम प्रतिसाद प्रणालीचे खास प्रशिक्षण

लोणावळा : पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथील प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांना त्यांचे सांघिक कौशल्य वापरुन उपलब्ध साधनसामुग्रीचा प्रभावी वापर कसा करावा तसेच आपत्कालीन परस्थितीत पिडीत लोकांना तातडीने मदत कशी पुरवावी याबाबतचे प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) यांच्याकडून देण्यात आले.

      प्रशिक्षणातून सक्षम व जबाबदार भविष्य निर्माण करण्याच्या हेतूने पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळयाचे प्राचार्य एम. एम. मकानदार, उप प्राचार्य डॉ. अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (20 मे) सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्या करिता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) बटालिअन 5 मधील कमांडर इन्स्पेक्टर मोहित शर्मा व त्यांच्या टीमने पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व आंतरवर्ग व बाहयवर्ग प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे करीता वैदयकीय प्रथम प्रतिसाद प्रणाली याबाबत व्याख्यान दिले. यामध्ये आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना व त्याचे पिडीत लोकांना महत्व, जखमी अवस्थेत प्रथमोपचार कसा करावा, CPR केव्हा आणि कोणत्या परस्थितीत कसा दयावा याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखविले व त्याचा सराव प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांचेकडून करून घेतला.

      सदर प्रशिक्षणाचे आयोजन पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळ्याचे प्राचार्य एम. एम. मकानदार, उप-प्राचार्य डॉ. अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयश्री चिवडशेट्टी व पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी केले. सदर व्याख्यानास प्रभारी उप प्राचार्य प्रकाश वाडकर, प्रशिक्षण सत्र समन्वय अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे, वैदयकीय अधिकारी श्रीमती भायेकर, पो. निरीक्षक दुर्गेश शेलार, पो. निरीक्षक निता मिसाळ, पो. निरीक्षक नंदकुमार मोरे, राखीव पो. निरीक्षक श्री कोळी यांचेसह इतर आंतरवर्ग व बाहयवर्ग स्टाफ हजर होता.

इतर बातम्या