Breaking news

Ekvira News : एकविरा देवी मंदिर व कार्ला लेणी परिसरात वन विभागाकडून सौर दिवे, सौर सिसीटिव्ही कॅमेरे व बाकडे बसविण्यात आले

लोणावळा : वनपरिक्षेत्र शिरोता अंतर्गत असणारे मौजे वेहेरगाव (कार्ला) येथील  श्री एकविरा देवी दर्शना साठी व जगप्रसिद्ध कार्ला लेणी पाहण्यासाठी खूप मोठया प्रमाणात भाविक भक्त व पर्यटक येत असतात. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून श्री एकविरा देवी व कार्ला लेणी परिसरात वन विभागातर्फे सौर दिवे व सौर सी. सी.टी व्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने पूर्ण परिसर प्रकाशमय व सी.सी. टीव्ही कॅमेरा सुरक्षित झाला आहे. तसेच येणाऱ्या भक्त भाविकांच्या सोयीसाठी जागोजागी बेंच देखील बसविण्यात आले आहेत. 

       हे काम मुख्य वनसंरक्षक एन. आर‌. प्रविण व उप वनसंरक्षक पुणे राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशिल मंतावार यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पातळीवर करण्यात आले. त्या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार, वनपरीमंडळ अधिकारी कार्ला प्रमोद रासकर तसेच वनरक्षक गणेश धुळशेटे उपस्थित होते. तसेच परिसरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी वनविभागा मार्फत बाॅटल क्रशर लवकरच बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. सदर उपक्रमाचे वन्यजीव रक्षक मावळ संस्था, गावकऱ्यांनी व भाविकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

इतर बातम्या