Breaking news

ब्राम्हणोली येथील श्री भैरवनाथ उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ

पवनानगर : ब्राम्हणोली येथील श्री भैरवनाथ उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. काले येथील प्रवचनकार ह.भ.प. भाऊ महाराज कालेकर यांच्या हस्ते विणा पूजन, ज्ञानेश्वरी पूजन करुन सप्ताहाला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. सदर अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि.18 मार्च ते दिनांक 22 मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे. 

      या दरम्यान श्री भैरवनाथ उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहात खालीलप्रमाणे प्रवचनकार व‌ किर्तनकार यांची सेवा संपन्न होणार आहे. प्रवचनकार -  ह.भ.प. भाऊ महाराज कालेकर, ह.भ.प. घनश्याम महाराज पडवळ, ह.भ.प. महादेव महाराज घारे, ह.भ.प.शंकर महाराज आडकर यांची सेवा संपन्न होणार आहे. 

किर्तनकार - ह.भ.प. ॠषिकेश महाराज चोरघे, ह.भ.प. आशिष महाराज मेणे, ह.भ.प. कृष्णा महाराज पडवळ, ह.भ.प. केशव महाराज मुळीक यांची किर्तनरुपी सेवा होईल. तर बुधवार दिनांक 23 मार्च रोजी ह.भ.प. तुषार महाराज दळवी यांचे काल्याचे किर्तन संपन्न होईल.

तसेच दररोज काकड आरती, हरिपाठ व पवनमावळातील विविध गावांतील जागर संपन्न होईल. अखेरच्या दिवशी देवाचा महाअभिषेक, आरती व पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे तर संध्याकाळी सोमनाथ कला पथक भजनी भारुड सडवली यांचा भारुडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. परिसरातील सर्व सांप्रदायिक क्षेत्रातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन ब्राम्हणोली ग्रामस्थ व उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या