Shree Shivaji Mitra Mandal Trust : लोणावळ्यात मावळच्या राजासमोर महिलांचे अथर्वशीर्ष पठण

लोणावळा : मावळचा राजा अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरातील श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट या ठिकाणी बाप्पांसमोर काल बुधवारी महिलांकडून अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. मंगळवारी दुपारी ढोल ताशांच्या गजरामध्ये व फुलांची उधळण करत अतिशय मंगलमय व जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश चौहान, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश पोरवल व विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. बाप्पांच्या स्वागतासाठी ट्रस्टच्या वतीने यावर्षी तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून त्यासमोर नेत्र दीपक फाउंटन उभे करण्यात आले आहे.
भांगारवाडी येथील अनुजा वाडेकर व त्यांच्या सहकारी महिला भगिनी यांनी बाप्पांसमोर अथर्वशीर्षाचे पठण केले. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज दुपारी बापान समोर हुडको येथील जयश्री काळे व महिला मंडळाच्या वतीने भजनसंध्येचा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.