Breaking news

Shree Shivaji Mitra Mandal : मावळच्या राजाची उद्या दुपारी 12.30 वाजता होणार प्राणप्रतिष्ठा

लोणावळा : मावळचा राजा अशी ओळख असलेल्या लोणावळ्यातील श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने उद्या मंगळवारी (19 सप्टेंबर) रोजी दुपारी 12.30 वाजता बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. बाप्पांच्या आगमनासाठी यावर्षी मंडळाच्या वतीने पुरंदरे ग्राउंड वर भव्य स्वरूपात तिरुपती बालाजी येथील तिरुमाला तिरुपती मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मागील महिनाभरापासून हे मंदिर उभारणीचे काम सुरू होते. मंदिराच्या समोर फाऊंटन तयार करण्यात आले आहे.

      बाप्पांच्या आगमनापासून यावर्षी मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवारी बाप्पांचे आगमन. बुधवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता अथर्वशीर्ष पठण अनुजा वाडेकर या करणार आहेत. सायंकाळी देखाव्याचे व मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गुरुवारी 21 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी शिवसेवा प्रतिष्ठान भांगरवाडी येथील लहान मुलांचे सायंकाळी 6.30 वाजता अथर्वशीर्ष पठण होणार आहे. शनिवारी 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता सुनील बोके यांचा गायन व वादन कार्यक्रम होणार आहे. रविवारी 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता गायक प्रदीप वाडेकर यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता अनुजा वाडेकर या मंगळागौर कार्यक्रम घेणार आहेत. मंगळवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता गणेश याग व दुपारी 3.00 वाजता सत्यनारायण पूजा होणार आहे. बुधवारी 27 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता गायक शत्रुघ्न खंडेलवाल यांचा सुरसम्राट हा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.00 वाजता सालाबाद प्रमाणे पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य दिव्य अशी वाजत गाजत बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

  प्रकाश मेघराज चौहान हे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून प्रकाश पोरवाल हे यावर्षीच्या उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत तर मोहन वाघमारे हे कार्याध्यक्ष आहेत. सचिव पदाची धुरा राजेंद्र चौहान सांभाळत असून उपाध्यक्ष म्हणून हिरालाल जैन, जयंतीलाल ओसवाल, मुकेश परमार काम पहात आहेत. कांतीलालजी भंडारी हे मंडळाचे खजिनदार व राहुल चौहान हे सह खजिनदार आहेत. मुख्य संरक्षक म्हणून चेतन चौहान, प्रसिद्धी प्रमुख : सुनिल बोके, निमंत्रक : शिव अग्रवाल, समन्वयक : राजेंद्र टाटिया, संयोजक दिलीप पवार हे काम पहात आहेत. मंडळाकडून बनविण्यात आलेल्या स्मरणिकेचे मुख्य संपादक म्हणून राजेंद्र चौहान व सहसंपादक म्हणून चेतन चौहान यांनी काम पाहिले आहे.

इतर बातम्या