Lonavala News : लोणावळ्यात 6 जून रोजी साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा

लोणावळा : सालाबाद प्रमाणे यावर्षी ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा लोणावळ्यात मंगळवार 6 जून 2023 रोजी मोठ्या दिमाखात व भव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता छत्रपतींवर शास्त्रशुद्ध पद्धतीने दुग्धाभिषेक करून राज्याभिषेक संपन्न होईल. तसेच सायंकाळी 5 वाजता श्रीं ची मिरवणूक ही श्रीराम मंदिर भांगरवाडी पासून सुरु होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोणावळा येथे मिरवणूकीची सांगता होईल.
हा फक्त शिवराज्याभिषेक सोहळा नसून अवघ्या महाराष्ट्रासाठी गौरवशाली उत्सव असल्याने शिवराज्याभिषेक सोहळा समिती लोणावळा यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. लोणावळा व पंचक्रोशीतील नागरिकांनी सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.