Breaking news

Lonavala Political News | लोणावळा शहरातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार; महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व घटक पक्षांच्या निर्धार

लोणावळा : लोणावळा शहरांमधून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीमध्ये सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांनी व्यक्त केला आहे सोमवारी सायंकाळी लोणावळा शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने हा निर्धार व्यक्त केला आहे. ज्या लोणावळा शहराने कायमच विद्यमान खासदारांना मताधिक्य दिले त्यांनी मात्र निवडून आल्यानंतर या शहराला दुय्यम स्थान दिले असल्याची भावना यावेळी लोणावळा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. मतदार देखील बदल हवा असल्याचे सांगत असल्याने निश्चितच महाविकास आघाडीला लोणावळा शहरांमधून चांगले मताधिक्य मिळेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.

    या आढावा बैठकीला शिवसेनेचे मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, मावळ लोकसभेचे प्रचार प्रमुख योगेश बाबर, कॉग्रेस आय महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर, उपजिल्हाप्रमुख रोमी सिंदू, कॉग्रेस आय सेवादल प्रदेश अध्यक्ष बाबुभाई शेख, मावळ तालुका नियोजन समिती प्रमुख योगेश कोंढाळकर, महिला आघाडी सहसंपर्क संघटिकी शादानभाभी चौधरी, मावळ तालुका प्रमुख आशिषभाऊ ठोंबरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका सल्लागार प्रमुख मारूती खोले, युवासेना मावळ तालुका अधिकारी उमेश गावडे, शिवसेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख भारत ठाकुर, कॉग्रेस शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष अध्यक्ष पप्पूभाई (नासिर) शेख, मा.नगराध्यक्षा उषाताई चौधरी, राजू गवळी, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते यशवंत पायगुडे, प्रवक्ते फिरोज शेख, राष्ट्रवादी मा.अध्यक्ष राजू बोराटी, मा.नगरसेवक बाळासाहेब शिर्के, माणिक मराठे, सुनिल ईंगुळकर, सिंधू परदेशी, प्रकाश काळे, संध्या खंडेलवाल,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष श्वेता वर्तक, जयवंत दळवी, रामभाऊ थरकुडे, मनेष पवार, प्रकाश पाठारे, प्रविण काळे, भगवान देशमुख, विजय आखाडे, नरेश काळवीट, अनिल कडु, प्रभाताई अकोलकर, प्रतिभा कालेकर, सुरेखा देवकर, शोभा चव्हाण, अनिता गायकवाड, रविंद्र टाकळकर, रतन मराठे, बाळासाहेब मोहोळ, संजय शिंदे, उल्हास भांगरे, अशोक गव्हारणे, कमर अन्सारी, वसंत ढोरे, प्रशांत आजगेकर, सुनिल तळेकर, शंकर नाणेकर, विभाग संघटक परेश बडेकर, जितेंद्र ठोंबरे, सुनिल मराठे, अभिषेक ईंगुळकर, आदित्य दाभणे, संजय जाधव, कुणाल सपकाळ, धिरज घारे आदी महाविकास आघाडीचे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     प्रभाकर पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली तसेच 381 बूथ नुसार करण्यात आलेल्या तयारीचा आढावा देखील घेण्यात आला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी मधील शिवसेनेचे उमेदवार वाघेरे यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकतीने उभे राहून लोणावळा शहरांमधून जास्तीत जास्त मतदान देण्याचे आश्वासन देण्यात आले.

इतर बातम्या