ITI नांगरगाव यांच्या वतीने आयोजित PM SKILL RUN या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये संदेश भोईर व दुर्गा डाहाट प्रथम

लोणावळा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नांगरगाव औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (ITI) यांच्या वतीने PM SKILL RUN या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. नांगरगाव औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ते मनशक्ती केंद्र व पुन्हा नांगरगाव औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अशी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मुलांच्या गटांमध्ये संदेश नामदेव भोईर याने प्रथम क्रमांक मिळवला तर मुलींच्या गटामध्ये दुर्गा राजेश डाहाट हिने प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेमध्ये मुलांच्या गटामधील दुसरा क्रमांक शुभम राजेभाऊ वाघमारे यांनी तर तिसरा क्रमांक संतोष वसंत सुपे यांनी मिळवला मुलींच्या गटामधील दुसरा क्रमांक लक्ष्मी संतोष गार्डे हिने तर तिसरा क्रमांक मानसी सोमनाथ शिंदे हिने मिळविला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून एस. एस. खराडे व आर. जे. कांबळे यांनी काम पाहिले. दोन्ही गटातील प्रथम क्रमांकाला अनुक्रमे तीन हजार रुपये दुसऱ्या क्रमांकाला दोन हजार रुपये व तिसऱ्या क्रमांकाला एक हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन नामदेवराव भोसले सहसचिव कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्य विभाग महाराष्ट्र शासन, राजेंद्र कुऱ्हाडे वित्त आयुक्त, आय एम सी चेअरमन संतोष राऊत, मनमुक्त फाउंडेशनच्या संचालिका मुक्ता नामदेव भोसले, मनीषा कुऱ्हाडे आयटीआय संस्थेच्या प्राचार्य पी.पी. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
कौशल्य विकासावर आधारित विविध बॅनर हातामध्ये घेत विद्यार्थ्यांनी मॅरेथॉन मधून जनजागृती केली सदरची स्पर्धा पार पडल्यानंतर नांगरगाव औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधील चालू वर्षांमधील गुणवंत पदवीदान समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस के गायकवाड यांनी केले. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी यावेळी संस्थेविषयी मनोगते व्यक्त करत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेमधील सर्व शिक्षक वृंदांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचा समारोप गटनिर्देशक एस. व्ही. पासलकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.