शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या मावळ तालुका प्रमुख पदी लोणावळ्यातील रोहित वरणकर यांची नियुक्ती

लोणावळा : शिवसेना बांधकाम कामगार सेना, महाराष्ट्र राज्य (एकनाथ शिंदे गट) या संघटनेच्या मावळ तालुका प्रमुख पदी लोणावळ्यातील रोहित अनंत वरणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना बांधकाम कामगार सेना, महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रीतम धारिया व पुणे जिल्हा प्रमुख संतोष राजपूत यांच्या हस्ते पुण्यातील त्यांच्या कार्यालयात ही नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार ध्यानात ठेवत वाटचाल करावी व पक्ष वाढीसाठी काम करावे असे यावेळी संतोष राजपूत यांनी सांगितले.