Breaking news

महत्वाची बैठक l केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत लोणावळा नगरपरिषदेत 27 एप्रिल रोजी आढावा बैठक

लोणावळा : भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रविवार, 27 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजता लोणावळा नगरपरिषदेमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

      लोणावळा नगरपरिषदेत गेल्या चार वर्षांपासून प्रशासक राजवट लागू आहे. या कालावधीत शहरात झालेल्या व सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, लोणावळा शहरात काही विकास प्रकल्प हे केंद्र शासनाशी निगडित असल्याने त्यांची सद्यस्थिती, अडचणी आणि प्रगती यावर देखील चर्चा होणार आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे विविध प्रकल्पांची माहिती, पूर्णत्वाचा कालावधी तसेच संबंधित यंत्रणांच्या कार्यप्रणालीबाबत थेट माहिती घेणार आहेत.

       या पार्श्वभूमीवर, लोणावळा शहरातील विकासकामांबाबत नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांना जर कोणती निवेदने सादर करायची असतील, तर ती त्यांनी लेखी स्वरूपात या बैठकीदरम्यान सादर करावी, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस आणि लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केले आहे.

इतर बातम्या