Lonavala News l पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये काँग्रेस कमिटी कडून जाहीर निषेध

लोणावळा : काश्मीर खोऱ्यामधील पहेलगाम बैसरन घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 24 पर्यटक जखमी झाली आहेत. पहेलगाम येथील या अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये काँग्रेस कमिटी कडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी काँग्रेस पक्ष हा भारत सरकारच्या सोबत आहे असे यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर यांनी सांगितले. भारत सरकारने कडक पावले उचलत या दहशतवादाचा समूळ नाश करावा अशी मागणी लोणावळा शहर काँग्रेस कमिटी कडून करण्यात आली आहे. तसेच या अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना उपस्थित त्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व जखमी लवकर बरे व्हावेत याकरिता प्रार्थना करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व लोणावळा शहर काँग्रेसचे प्रभारी निखिल कवीश्वर, माजी उपनगराध्यक्ष संध्या खंडेलवाल, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, काँग्रेस कार्ड कमिटी सदस्य सुबोध खंडेलवाल, कम्मुभाई जस्दनवाला, हाजी अब्बास शेख, मंगेश बालगुडे, योगेश गवळी, संजय तळेकर, अजय राऊत, सुर्यकांत औरंगे व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.