Breaking news

Blood Donation Camp l सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा येथे रक्तदान शिबिर संपन्न; 80 रक्तदात्यांनी केले रक्तदान

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते.

       80 हून अधिक स्वयंसेवकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेत रक्तदान केले. रक्तदान हे सर्वोत्तम दान आहे आपल्या एका रक्तदानाने एका व्यक्तीचा जीव वाचू शकतो. रक्तदानापूर्वी प्रत्येक रक्तदात्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉ. संजय पाटील यांच्या समन्वयाखाली श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस अँड जनरल हॉस्पिटलच्या रक्तपेढीने रक्त संकलन केले.

        शिबिराचे उद्घाटन लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एस.डी. बाबर, एस.के.एन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे ऍण्ड सायन्स चे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले, सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ फर्म्यासुटिकल सायन्सेस च्या प्राचार्या डॉ. रुकसाना पिंजारी, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्राचार्या  डॉ. अंजली चॅटर्टन, निवृत्ती बाबाजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य डॉ.उर्मिला पाटील, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड कॉम्प्युटर ऍप्लिकेशच्या संचालिका डॉ. प्राची मुरकुटे, सिंहगड पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. एन. के. मिश्रा, काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई आणि शैक्षणिक विभागाचे डीन डॉ. डी. एस. मंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले. रक्तदान शिबिर आयोजक डॉ. संतोष म्हेत्रे, सिंहगड एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष दबडे, प्राध्यापक सदस्य प्रा. सुलक्षणा पाटील, प्रा. सतीश मेंडके, प्रा. सुहास डफळ, प्रा. अनंत घोळवे आणि प्रा. कल्पना जाधव, यांसह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित झाला. एनएसएस स्वयंसेवकांनी या शिबिराचे नियोजन केले होते.

      या शिबिरासाठी संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित. एम. नवले (एचआर) आणि डॉ. रचना नवले अष्टेकर (प्रशासन) यांचे प्रमुख योगदान लाभले.

इतर बातम्या