जागतिक वसुंधरा दिनानिमित्त लोणावळा नगरपरिषदेचा हरित उपक्रम

लोणावळा : 22 एप्रिल या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने एक प्रेरणादायी वृक्षारोपण उपक्रम रायवूड येथील गणपती मंदिर रोडवरील ऑक्झिलियम काॅन्व्हेन्ट हायस्कूलच्या पाठीमागील परिसरात राबवण्यात आला.
या उपक्रमात "माझी वसुंधरा" ही शपथ घेण्यात आली व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. सध्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम काळाची गरज ठरत आहे.
कार्यक्रमात नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता श्री. यशवंत मुंडे, कार्यालय अधीक्षक श्री. संतोष खाडे, स्वच्छता निरीक्षक सौ. ऐश्वर्या काटकर, श्री. विजय लोणकर, श्री. जितेंद्र राऊत, शहर समन्वयक श्री. विवेक फडतरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन, हरित शहराची संकल्पना आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.