Breaking news

Lonavala News l पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये सर्व पक्षियांकडून जाहीर निषेध

लोणावळा : काश्मीर खोऱ्यामधील पहेलगाम बैसरन घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 24 पर्यटक जखमी झाली आहेत. पहेलगाम येथील या अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये सर्वपक्षीयांकडून जाहीर निषेध करण्यात आला. लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्ष नागरिक व पत्रकार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आज 24 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

      लोणावळा शहरांमधील भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी या सर्व राजकीय पक्ष विविध संघटना व नागरिक हे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्र जमत त्यांनी पाकिस्तानी दहशतवादी यांनी काश्मीर खोऱ्यामध्ये घुसून भारतीय पर्यटकांवर केलेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे. अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला, पुरुष पर्यटकांच्या अंगावरचे कपडे उतरवत त्यांच्यावर गोळीबार केला. अतिशय संताप आणणारा असा हा सर्व प्रकार असून, भारत देशामध्ये धर्माचे बीज रोहणार्‍या या पाकधार्जीनी प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध थोडा आहे.

       याकरिता भारत सरकारने ठोस पावले उचलत या अतिरेक्यांचा खात्मा करावा तसेच या अतिरेक्यांचा अड्डा असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी या निषेध मोर्चेच्या दरम्यान सर्वपक्षीयांनी केली आहे. भारत देशात राजकीय पटलावर सर्व वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत असले तरी देशाच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व एक आहोत हे या मोर्चाच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत दाखवून दिले आहे व देशाच्या संरक्षणावर घाला घालणाऱ्या प्रवृत्तीला ठेचण्यासाठी आम्ही सर्व सरकारच्या सोबत आहोत असे आश्वासन देखील या निमित्ताने देण्यात आले आहे.

इतर बातम्या