Breaking news

Lonavala Shivsena : पुणे जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत राजेश इरले ठरला हिंदूहृदयसम्राट श्री तर फिरोज शेख लोणावळा श्री 2023 चा मानकरी

लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे लोणावळा शहर यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत राजेश इरले हा हिंदूहृदयसम्राट श्री 2023 या टायटलचा तर फिरोज शेख हा लोणावळा श्री 2023 या टायटलचा मानकरी ठरला. मोस्ट इम्र्पूड बॉडी बिल्डर म्हणून रोहन गवाले, बेस्ट पोजर बॉडी बिल्डर आदेश ढोरे व अपकमिंग बॉडी बिल्डर म्हणून आवेज शेख यांना सन्मानित करण्यात आले.

    हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे लोणावळा शहर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

१० मार्च रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड व मा शहरप्रमुख बबनराव अनसुरकर यांच्या हस्ते जयचंद चौक येथे ध्वजारोहण करण्यात आले.

शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश केदारी, महिला आघाडी शहरसंघटिका कल्पना आखाडे, मा नगरसेवक शिवदास पिल्लै, शिवजयंती महोत्सव अध्यक्ष मनेष पवार, कार्याध्यक्ष पंकज खोले, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लोणावळा शहर व परिसरातील शिवज्योतीचे स्वागत व सत्यनारायण पूजा संपन्न झाली. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. लोणावळा उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक, लोणावळा शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यावेळी उपस्थित होते. शनिवार दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी "भव्य नृत्य स्पर्धा" पार पडल्या. शिवसेना महिला पदाधिकार्‍यांनी या स्पर्धेचे आयोजन, नियोजन केले होते.

रविवार दिनांक 12 रोजी सायंकाळी पुणे जिल्हास्तरीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा हिंदुहृदयसम्राट श्री व लोणावळा श्री ही शरीर सौष्ठव स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे शिवसेना उपनेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ आहिर, मावळ विधानसभेचे आमदार सुनिल आण्णा शेळके, मावळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, राजेश पळसकर, अनिकेत घुले, विजय तिकोणे आदीसह मान्यवर व शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरीर सौष्ठव स्पर्धेचे प्रास्ताविक शहराध्यक्ष बाळासाहेब फाटक यांनी सूत्रसंचालन संजय भोईर यांनी केले तर उत्सव समितीचे अध्यक्ष मनेश पवार यांनी आभार मानले.

इतर बातम्या