Breaking news

Maval News : पोपटराव वहिले यांची मावळ राष्ट्रवादीच्या जेष्ठ नागरिक सेलच्या सल्लागार पदी निवड

लोणावळा : वडगावचे माजी सरपंच तसेच मावळ तालुका देखरेख सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष पोपटराव मारुतराव वहिले यांची राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका जेष्ठ नागरिक सेलच्या सल्लागार पदी नुकतीच निवड करण्यात आली. निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे व जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष विष्णू शिंदे यांच्या हस्ते पोपटराव वहिले यांना देण्यात आले.

    या वेळी मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे, उपसभापती नामदेव शेलार, देहूरोड राष्ट्रवादी काँ. मा. अध्यक्ष अँड. कृष्णा दाभोळ, तालुका राष्ट्रवादी काँ. उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, वडगाव शहरचे अध्यक्ष प्रवीण ढोरे, रणजीत हिंगे, राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले, निरंजन बोत्रे, विराज वहिले सह पदाधिकारी उपस्थित होते. वहिले हे वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सलग 25 वर्ष चेअरमन देखील होते. 

इतर बातम्या