Breaking news

Political News : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस नवे उपमुख्यमंत्री

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना आज थेट मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. भाजपाने स्वतःचा डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शिवसेनेचा मराठी चेहरा असलेल्या शिंदे यांना मुख्यमंत्री बनविले तर मी पुन्हा येणारी अशी गर्जना करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेना व महाविकास आघाडी अडचणीत आली होती. मागील दहा दिवसांपासून राज्याच्या राजकारणात भुकंप घडविणार्‍या घटना घडामोडी सातत्याने घडत होत्या. काल राज्यपाल व सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे सरकारला 24 तासात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. मात्र माझेच लोक माझ्या विरोधात जाणार असतील तर मला ते पद नको असे म्हणत व संख्याबळाच्या खेळात मला रस नाही असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व विधान परिषद सदस्यत्वाचा काल राजीनामा दिला होता. खरंतर शिंदे यांच्या बंडामागे भाजपा आहे हे जगजाहिर होते मात्र भाजपाचा एकही नेता उघडपणे पुढे येऊन त्याला दुजारा देत नव्हता. राज्यपालांनी ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगितल्यानंतर भाजपाच्या गोटातील हालचालींना वेग आला. मात्र उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापुर्वी महाराष्ट्रातील जनतेशी भावनिक संवाद साधत राजीनामा दिला. आमदारांनी बंड पुकारले तेव्हा देखील ठाकरे यांनी शिवसैनिक व आमदार यांना भावनिक साद घातली होती. मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली असली तरी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली आहेत. यामुळे मागील 24 तासात ठाकरे यांना मोठी सहानुभूती मिळू लागली होती. सोशल मिडियामध्ये ठाकरे यांच्या समर्थनार्थ तर फडणवीस व भाजपा विरोधात पोस्ट फिरू लागल्याने निर्माण झालेला व पुढे होणारा डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजपाने मास्टरस्ट्रोक मारला व पत्रकार परिषदेत अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ही घोषणा करताना फडणवीस यांच्या चेहर्‍यावर कोठेही आनंद नव्हता. सायंकाळी सात वाजता एकनाथ शिंदे हे एकटेच मुख्यमंत्री पदाची शपत घेतील असे फडणवीस यांनी जाहिर केले. साडेसात वाजता मात्र व्यासपीठावर दोन खुर्च्या लावलेल्या दिसल्या. दरम्यानच्या काळात काय घडलं हे स्पष्टपणाने समोर आले नसले तरी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपत फडणवीस यांनी घेतली. माझ्या पक्षाच्या आदेशाचा मी आदर करतो असे त्यांनी म्हंटल्याने देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करत उपमुख्यमंत्री पदाचा स्विकार केला हे स्पष्ट झाले आहे. शिंदे यांना दिलेली मुख्यमंत्री पदाची संधी हा मास्टरस्ट्रोक आहे की स्वतःचा डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठीचा प्रयत्न हे येत्या काळात स्पष्ट होईल. 

शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यायचे होते तर मंग 31 महिन्यांपुर्वी का दिले नाही?

भाजपाने मोठ्या मनाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविले असे भासविले जात असले तर त्यामागील भाजपाचा हेतू काहीतरी वेगळाच आहे हे न समजण्याइतकी महाराष्ट्रातील जनता भोळी नाही. जर मुख्यमंत्री पदाची संधी शिवसेनेला द्यायची होती तर मंग 31 महिन्यांपुर्वीच ती का दिली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्ष वाटून घ्या असे म्हणत असताना त्यावेळीच हा मनाचा मोठेपणा दाखविला असता तर कदाचित राज्यात महाविकास आघाडी जन्मालाच आली नसती व आता सुरु असलेले सत्तेचे महाभारत देखील घडले नसते अशी चर्चा सोशल मिडियावर जोरदार सुरु झाली आहे.

इतर बातम्या