Breaking news

Pawnanagar News : विजेचा धक्का लागल्याने वायरमनचा मृत्यू

पवनानगर : पवनानगर महावितरण विभागातील वायरमन अशोक रोहिदास मुळे (वय 27, रा. येळसे, पवनानगर) यांचा धामणदरा, आपटी येथे विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. शुक्रवारी (19 मे) सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. धामणदरा येथे विद्युत खांबावर मुळे हे विज दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ते दुधिवरे, आपटी, लोहगड परिसरात वायरमन म्हणून काम करत होते. 

    सध्या मावळात सर्वत्र विद्युत विभागाच्या वतीने पावसाळापूर्व कामांना सुरुवात झाली आहे. विद्युत तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, लोंबलेल्या तारा ओढून घेणे, वाकलेले खांब सरळ करणे, डीपी बदलणे ही कामे सुरु आहेत. ती कामे करताना वायरमन व इतर विद्युत विभागातील कर्मचार्‍यांनी योग्य ती खबरदारी व सुरक्षा उपकरणे सोबत घेऊनच कामे करावीत व काळजी घ्यावी.

इतर बातम्या