Breaking news

Lonavala News l मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यासाठी मॅक डोनाल्ड येथील पहिल्या मजल्यावर शिबिराचे आयोजन

लोणावळा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी लोणावळा स्क्वेअर मॉल येथील मॅक डोनाल्ड च्या वरील पहिल्या मजल्यावर व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आमदार सुनील शेळके युवा मंचचे धनंजय काळोखे यांनी दिली. तसेच प्रभाग क्रमांक 13 मधील महिलांसाठी याठिकाणी येण्यासाठी व जण्यासाठी मोफत रिक्षा सेवा ठेवण्यात आली असल्याचे वसंतराव काळोखे यांनी सांगितले. 

      महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेत समाविष्ट महिलांना प्रत्येक महिन्याला 1500/- रुपये मिळणार आहेत. याकरिता जास्तीत जास्त महिनाचा यामध्ये समावेश करून घेण्यासाठी जागोजागी या योजनेचे अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. सुनील शेळके युवा मंचचे दीपक मालपोटे यांच्या माध्यमातून देखील भांगरवाडी भागात अर्ज भरून घेतले जात आहेत. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपले अर्ज भरून घ्यावेत असे आवाहन आमदार सुनील शेळके युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या