Accident News l मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळ कंटेनरचा अपघात; कार व दुचाकीला दिलेल्या धडकेत चार जण जखमी

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा खंडाळा दरम्यान असलेल्या राज हॉटेल समोर आज रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरचा वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने त्या कंटेनरने रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईटच्या कामाला धडक देत समोर जाणारी कार व दुचाकी यांना देखील धडक दिली व कंटेनर पलटी झाला. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मागील आठवड्यात देखील खंडाळा बॅटरी या ठिकाणी एका अवजड वाहनाने समोर जाणाऱ्या कारला धडक दिल्याने भीषण असा अपघात झाला होता. लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद असताना देखील मोठ्या प्रमाणात अवजड वाहने शहरातून जात असल्यामुळे दिवसेंदिवस्या प्रमाणात वाढ होत आहे.