Breaking news

MAVAL MAZA ANNIVERSARY : वाचकांच्या उदंड प्रतिसादाने 'मावळ माझा' बनलंय मावळातील लोकप्रिय न्युज पोर्टल

मावळ माझा : मावळ माझा न्युज पोर्टलचे दोन वर्षाचे सिंहावलोकन आपल्यासमोर मांडताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. "बातमी क्षणा क्षणात मना मनात" हे ब्रिद वाक्य घेऊन 5 आँगस्ट 2020 रोजी सुरू झालेल्या 'मावळ माझा' या न्यूज पोर्टल ला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून 2 वर्षात 1 लाख 60 हजार ऐवढा प्रचंड मोठा वाचक वर्ग (युजर्स) मावळ माझा सोबत जोडला गेला आहे. काळानुसार बदल हा निसर्ग नियम आहे. या निसर्ग नियमांनुसार लोणावळा व मावळवासीयांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आम्ही mavalmaza.com या नावाने 5 आँगस्ट 2020 रोजी न्युज वेब पोर्टल सुरू केले. मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची बितंम बातमी क्षणा क्षणात वाचकांना देऊन त्यांच्या मना मनात मावळ माझा डाॅट काॅम हे न्युज वेब पोर्टल घर करेल हा आमचा विश्वास वाचकांनी सार्थ ठरविला आहे. पहिल्या वर्षात 40 लाख हिटस् व 30 हजार वाचक (युजर्स) तर दोन वर्षात 1 लाख 60 हजार वाचक (युजर्स) व काही कोटी हिटस् ही मावळ माझा च्या विश्वासार्हतेची पोच पावती आहे. 

      'पत्रकारितेच्या सर्व मूल्यांचे' पालन करत लोणावळा शहर, ग्रामीण परिसर व मावळ तालुक्यातील तसेच पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील प्रत्येकाच्या मना मनात घर करेल अशी बातमीची विश्वासार्हता जपण्याचा शब्द या निमित्ताने आम्ही पुन्हा सर्व वाचकांना देतो. केवळ लोणावळा व मावळच नव्हे तर कामानिमित्त राज्याच्या विविध भागात, देशात व परदेशात गेलेले नागरिक मावळ माझा न्युज पोर्टल रोज आवर्जून पाहतात. हे याठिकाणी खास करून नमूद करावसे वाटते. पुणे जिल्हा व मुंबई सह अन्य काही जिल्ह्यांमधील नागरिक मावळ माझा चे नियमित वाचक बनले आहेत. संत महात्म्याचा चरणस्पर्श व निसर्ग संपदेचा वारसा लाभलेल्या व समृद्ध असलेल्या मावळ तालुक्याला परखड व अचूक बातम्याच्या माध्यामातून आजून समृद्ध व वैभवशाली बनवत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबध्द असू. चांगल्याचे कौतूक व वाईटावर प्रहार हाच आमचा बाणा असेल. इंटरनेटमुळे आज सर्व जग जवळ आले आहे. या आधुनिक जगात जगत असताना आपल्या आजुबाजुला घडणारी प्रत्येक लहान मोठी घटना व घडामोड याची परिपुर्ण व खात्रीशीर माहिती ती देखील क्षणा क्षणात आपल्या हाताच्या बोटाच्या एका क्लिकवर व्हावी याकरिता तरुणाईच्या हातातील ताईद असलेल्या डिजिटल माध्यमापैकी वाॅटसअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम, टेलीग्राम, गुगल या सर्व पेजवर मावळ माझा डाॅट काॅमची लिंक व बातमी आपणास वाचनासाठी उपलब्ध आहे. न्युज वेब साईड मध्ये आम्ही सर्व वाचकांसाठी वेब लिंकचा पर्याय दिला आहे. यापैकी मावळ माझा च्या लिंकवरून आपण आमच्या वाॅटसअप ग्रुपला जाॅईन होऊन बातम्यांचे अपडेटस मिळवू शकता. सोबतच इतरही काही महत्वाच्या लिंक आम्ही व‍ाचकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याद्वारे आपण महत्वाची माहिती मिळवत स्वतःला अपडेट ठेवू शकता. आपली वैयक्तिक व व्यावसायाची जाहिरात करण्याची नामी संधी मावळ माझा वर उपलब्ध आहे. शिक्षणाच्या, कामाच्या, उद्योग व्यावसायाच्या निमित्त आपण व आपल्यापैकी इतर कोणी राज्यात, देशात, जगात कोठेही असलात तरी आपल्या भागातील प्रत्येक महत्वाची बातमी आपणास मावळा माझा डाॅट काॅम या वेब पोर्टलवर वाचता येईल. 

   वाचकांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आम्ही सर्व वाचकांचे मनापासून आभार मानतो "आपल्या सर्वांची साथ सदैव आमच्या पाठिशी आहे व ती यापुढेही कायम रहावी " ही विनंती. 

(कष्ट हेच भांडवल व विश्वसनीय बातमी हीच आमची ओळख)

धन्यवाद...

टिम मावळ माझा



इतर बातम्या