Breaking news

महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या कर्माने बदल घडेल - विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

लोणावळा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील जनतेच्या हातात बळ राहिलेले नाही. कामगार उध्वस्त होत आहे. शेतकर्‍यांची अवस्था वाईट झाली आहे. युवकांच्या हाताला काम नाही, महिला सुरक्षित नाही. सर्वच घटकांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे. असे असताना महाविकास आघाडीला केवळ सरकार टिकविण्यात रस आहे. हे एकमेकावर टिका करतात व एकत्रही व नांदतात, त्यांना लाज शरम वाटत नाही अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज लोणावळ्यात केली. नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नार्‍यावर बोलताना दरेकर म्हणाले, राजकीय पक्ष म्हणून स्वबळाचा नारा कोणीही देऊ शकतो. मात्र आज राज्यातील जनतेला तुमच्या स्वबळाच्या नार्‍याचे काही देणेघेणे नाही. त्यांना त्यांचे कुटुंब, संसार व व्यवस्था कशी बळकट होईल याची चिंता लागलेली आहे. त्यांच्या हाताला बळ द्या नाही तर जनता तुम्हाला पळ काढायला लावेल असा टोला दरेकर यांनी लगावला.

   शिवक्रांती कामगार संघटनेच्या वतीने कोरोनाच्या संकट काळात देखील मावळ व पुणे जिल्ह्यातील काही कंपन्यांमध्ये कामगार हिताला प्राधान्य देत कामगारांचे भरघोस पगारवाढीचे करार केले आहेत. ह्या करारांची देवाणघेवाण आज विरोधी पक्षनेते व शिवक्रांती कामगार संघटनेचे प्रमुख सल्लागार प्रविण दरेकर यांच्या हस्ते झाली. यावेळी शिवक्रांती कामगार संघटनेचे चिटणीस व मावळ तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पाळेकर यांचा प्रविण दरेकर व कामगार संघटना प्रतिनिधी यांच्या हस्ते वाढदिवसाच्या निमित्त सन्मान करण्यात आला.

     शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अँड. विजयराव पाळेकर, भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, कामगार कायद्याचे अभ्यासक अँड. गौरव पोळ, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, शिवक्रांती कामगार संघटना चिटणीस रमेश पाळेकर, गुलाबराव मराठे, रविंद्र साठे, हनुमंत कलाटे, प्रतिक पाळेकर, रोहन आहेर, चंद्रकांत ढाकोळ यांच्यासह कंपन्यांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

   यावेळी बोलताना विजय पाळेकर म्हणाले शेतकरी हिताचे कायदे होऊनही केवळ राजकारणामुळे त्यांना विरोध होत आहेत. तसेच कामगारांच्या बाबतीत होऊ नये याकरिता काही राज्यातील कामगार संघटन‍ांच्या निवडक मंडळींचे एक महाराष्ट्र व्यापी शिष्टमंडळ तयार करून त्याचे नेतृत्व प्रविण दरेकर यांनी करावे. केंद्रीय कामगार मंत्र्यांची भेट घेऊन कामगार कायद्यात काही बदल सुचवू व कामगार उपेक्षित राहू नये याकरिता प्रयत्न करू असे सांगितले. अँड. पोळ यांनी कामगार कायद्यातील तरतुदी कामगार प्रतिनिधींना समजावून सांगितल्या.

इतर बातम्या