आमदारांवरील विघ्न दूर व्हावे याकरिता लोणावळा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे खंडोबा देवाला साकडे

लोणावळा : मावळचे आमदार सुनिल शेळके यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता व्हावी व सर्व विघ्न दूर व्हावे याकरिता लोणावळा शहर टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा चरणी साकडे घालण्यात आले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अमोल शेडगे यांनी दिली.
लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे सल्लागार निखिल कविश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनचे अध्यक्ष अमोल शेडगे, उपाध्यक्ष संतोष ससाणे, कार्याध्यक्ष संजय मावकर, खजिनदार अविनाश तिकोणे, विठ्ठल मंद्रुपकर, राहुल देशपांडे, मनोज मंद्रुपकर यांनी खंडोबा गडावर दर्शन घेत साकडे घातले.