Lonavala SSC RESULT : लोणावळ्यातील आँक्झिलियम काॅन्व्हेंट या एकमेव शाळेचा निकाल 100 टक्के तर लोणावळा शहराचा दहावीचा निकाल 88.84 टक्के

लोणावळा : लोणावळा शहरांमधील मुलींची शाळा असलेल्या रायवुड विभागातील आँक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल या एकमेव शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर लोणावळा शहराचा एकूण निकाल 88.84 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल देवघर गावातील देशमुख विद्यालयाचा 56.52 टक्के लागला आहे.
लोणावळा शहर व परिसरातील 19 शाळांमधून 1380 विद्यार्थ्यांनी दहावीची बोर्ड परिक्षा दिली होती. त्यापैकी 1226 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शाळा निहाय निकाल : आँक्झिलियम काॅन्व्हेंट हायस्कूल रायवुड - 100%, डीसी हायस्कूल खंडाळ - 85.96, व्हिपीएस हायस्कूल गवळीवाडा - 84.65, गुरुकुल विद्यालय तुंगार्ली - 98.46, डाॅ. बी.एन. पुरंदरे बहुविध विद्यालय - 88.69, डाॅन बाॅस्को हायस्कूल - 98.43, लोणावळा नगरपरिषद खंडाळा - 78.57, एकविरा विद्या मंदिर कार्ला - 96.22, शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय मळवली - 75.80, लोणावळा नगरपरिषद लोणावळा - 94.44, स्व. वामनराव हैभतराव देशमुख विद्यालय देवघर - 56.52, शांतीसदन स्कूल रायवुड - 75.00, लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक स्कूल - 93.54, सोजर माध्यमिक विद्यालय कुरवंडे - 88.88, आंतरभारती बालग्राम भुशी - 84.21, नागनाथ माध्यमिक विद्यालय औंढे - 75.00, अँड. बापुसाहेब भोंडे हायस्कूल भांगरवाडी - 98.03, ऑल सेंट चर्च बाराबंगला - 85.29, गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल - 88.57.