Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळ्यात गुरुवारी 11 जुलै रोजी 31 मिमी पावसाची नोंद; आज सकाळीच शहरात धुके

लोणावळा : लोणावळ्यात गुरुवारी 11 जुलै रोजी 24 तासात 31 मिमी (1.22 इंच) पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळ पासून पावसाने उघडीप घेतली होती. सायंकाळ नंतर पावसाला सुरुवात झाली होती. रात्री देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. आज सकाळीच लोणावळा परिसरात धुक्याचे काहूर माजले आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

    लोणावळा शहरात यावर्षी आज अखेर पर्यंत 1177 मिमी (46.34 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी देखील आजपर्यत 1167 मिमी (45.94 इंच) पाऊस झाला होता.

इतर बातम्या