Rain Update : लोणावळा शहर व मावळ तालुक्याला जोरदार अवकाळी पावसाचा तडाखा

लोणावळा : लोणावळा शहर व मावळ तालुक्याला आज अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. सायंकाळी चारनंतर वातावरणात बदल होत जात साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. तर ग्रामीण भागात शेतांमध्ये कडधान्यांची पिके व अन्य पिके असल्याने शेतकरी वर्गाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून लोणावळा व मावळ तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. हवामान विभागाने देखील चार पाच दिवसात पावसाची शक्यता वर्तवली होती. लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव या शहरी भागांसह पवन मावळ, नाणे मावळ व आंदर मावळाला या पावसाने झोडपले. लोणावळ्यात रायवुड विभागात वार्यामुळे झाड पडल्याने काही काळ विज पुरवठा खंडित झाला होता.
महत्वाच्या बातम्या वाचा -
त्या जखमी बाल शिव भक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू
वैष्णवी रसाळ सौभाग्यवती 2023 च्या मानकरी
आता आधारकार्ड करा आँनलाईन अपडेट ते देखील मोफत
कंटेनरच्या धडकेत वाकसई गावातील दुचाकी चालक व शाळकरी मुलगी जखमी