एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के; आर्या शेडे मावळ तालुक्यातील टॉपर

तळेगाव दाभाडे : येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेज, तळेगाव दाभाडेचा बारावीचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला आहे. सलग आठव्या वर्षी महाविद्यालयाने शतप्रतिशत निकालाची परंपरा कायम राखली असून, यंदा एकूण 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्वच शाखांचा निकाल 100% लागल्यामुळे महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. वाणिज्य शाखेतील आर्या शेडे हिने 94.67% गुण मिळवून मावळ तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेचे संचालक, प्राचार्य व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.
---
प्रथम तीन गुणवंत विद्यार्थी –
विज्ञान शाखा :
1. तनिष्का परदेशी – 87.33%
2. तस्नीम पठाण – 87.17%
3. श्री संदीप जगनाडे – 84.17%
वाणिज्य शाखा :
1. आर्या शेडे – 94.67%
2. राधिका गारगोटे – 91.83%
3. जुही उलवी – 91.17%
कला शाखा :
1. दिशा मकवाना – 91.83%
2. उत्तरा फाकटकर – 89.83%
3. किरणकुंवर देवरा – 84.83%
श्री जगनाडे@84.17% स्वयंअभ्यासाचा आदर्श
संदीप जगनाडे यांनी कोणताही खासगी क्लास न लावता केवळ स्वअभ्यासाच्या जोरावर 84.17% गुण मिळवले. वाचन, मनन, चिंतन आणि लेखनाच्या माध्यमातून अभ्यास करत त्यांनी मित्रांनाही मार्गदर्शन केले. चित्रकलेसाठी वेळ देत खेळ व विविध स्पर्धांतही सहभाग घेतल्यामुळे परीक्षेचा ताण कधीच जाणवला नाही, असे त्यांनी सांगितले. ते माजी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे व शिक्षण मंडळाचे माजी सभापती संदीप जगनाडे यांचे चिरंजीव असून त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशासनाचे अभिनंदन - या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य खिरोद चौधरी, उपप्राचार्या अनुराधा सोनावणे, शैक्षणिक विभाग प्रमुख ज्योती ज्योतवानी, मार्गदर्शक शिक्षकवृंद आणि संचालिका स्वाती चाटे यांनी केले आहे.