Breaking news

SSC RESULT l कार्ला येथील श्री एकविरा विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 %; स्नेहल शिंदे प्रथम क्रमांकाची मानकरी

लोणावळा : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला या शाळेचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 100% टक्के लागला आहे. यामध्ये स्नेहल विठ्ठल शिंदे या विद्यार्थिनींनी 95.40% गुण मिळवत शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. पल्लवी संतोष ढमाले या विद्यार्थिनीने 94.60% गुण मिळवत शाळेत दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. आर्या गणेश आहिरे या विद्यार्थिनीने 93.20 गुण मिळवत शाळेमध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. तर जवळपास आठ विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त मार्क मिळवले आहेत. 68 विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती.

     शाळेचे मुख्याध्यापक संजय वंजारे, दहावीचे वर्ग शिक्षक संजय हुलावळे, संगीता खराडे व सर्व  मार्गदर्शक शिक्षकांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, सह सचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, कॉलेजचे प्राचार्य संजय वंजारे, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच अभिषेक जाधव, माजी उपसरपंच किरण हुलावळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे, सनी हुलावळे, सदस्या वत्सला हुलावळे, भारती मोरे, सोनाली मोरे, उज्वला गायकवाड, पो पाटील संजय जाधव, संजय हुलावळे, संगीता खराडे अध्यापक मच्छिंद्र बारवकर, छाया सोनवणे, अलका आडकर, नरेंद्र इंदापूरे, प्रणाली उंबरे, उमेश इंगुळकर, बाबाजी हुलावळे, गणेश बोंबले यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. 

इतर बातम्या

समाजसेवेचा सुंदर उपक्रम l डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती अनुजा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि अनाथाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप