Breaking news

आनंदवार्ता l घेरेवाडी येथील निलेश कोकरे यांची महाराष्ट्र पोलीस विभागात यशस्वी निवड

लोणावळा : मावळ तालुक्यातील घेरेवाडी, लोहगड येथील निलेश बाळू कोकरे यांची महाराष्ट्र पोलीस विभागाच्या पोलीस भरती परीक्षेतून पुणे कारागृह विभागात नुकतीच यशस्वी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

     निलेश कोकरे हे एम एच करिअर अकॅडमी, कार्ला येथील विद्यार्थी असून, त्यांच्या यशामुळे संपूर्ण गावासह संस्थेचाही गौरव वाढला आहे. त्यांनी पोलीस भरतीच्या शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा आणि मुलाखतीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया प्रामाणिकपणे पूर्ण करत उत्कृष्ट कामगिरी केली. यशस्वी निवडीसाठी निलेश यांनी अकॅडमीतून मिळालेल्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग केला असून, वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास व आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. अकॅडमी मध्ये मार्गदर्शक मितेश हुलावळे व विजय जंगम यांनी त्याला उत्तम प्रशिक्षण दिले आहे.

      या यशाबद्दल एम एच करिअर अकॅडमीचे मार्गदर्शक, शिक्षकवर्ग, सहकारी विद्यार्थी तसेच कार्ला व घेरेवाडी परिसरातील नागरिकांनी निलेशचे अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील सेवापथासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर बातम्या

समाजसेवेचा सुंदर उपक्रम l डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती अनुजा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि अनाथाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप