Maval News : कामगार नेते अमोल भेगडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त किर्तनकार, प्रवचनकारांचा झाला सन्मान

लोणावळा : भारतीय जनता पार्टी मावळ तालुका कामगार आघाडीचे अध्यक्ष व कामगार नेते अमोल जगन्नाथ भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यामधील कीर्तनकार व प्रवचनकार यांचा सन्मान करण्यात आला. दहिवली गावात हा सोहळा पार पडला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, शिवसेना शिंदे गटाचे पुणे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड, माजी पंचायत समिती सभापती गुलाबकाका म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष नंदकुमार भसे, संतोष केदारी, ज्ञानेश्वर गुंड, कामगार नेते किसन येवले यांच्यासह दहिवली पंचक्रोशीतील नागरिक व मावळ तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत संस्कृती रक्षणाचे मोलाचे कार्य करणार्या किर्तनकार व प्रवचनकार मंडळींनी यावेळी मनोगते व्यक्त करताना अमोल भेगडे यांना आर्शिवाद दिले. कामगार क्षेत्रात मागील अनेक वर्ष काम करत अमोल भेगडे यांनी मोलमजुरी करणार्या बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरांचा लाभ दिला. अनेक अस्थापनांच्या विरोधात लढा देत कामगारांना त्यांचा हक्क मिळवून दिला. सर्वसामान्य कामगार, कष्टकरी यांच्यासाठी सातत्याने झटणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.कौटुंबिक सांप्रदायिक वारसा त्यांना लाभला आहे. त्यांचे वडील वारकरी होते. अमोल भेगडे हे सुद्धा उत्तम भजनकरी आहेत. यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने समाज जागृतीचे कार्य करणार्या किर्तनकार व प्रवचनकार मंडळींचा सन्मान सोहळा त्यांनी आयोजित केला होता. सन्मान सोहळ्यानंतर केक कापत व फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. थोरा मोठ्यांचे आर्शिवाद हेच सामाजिक जीवनात काम करण्याचे बळ देतात अशा भावना यावेळी अमोल भेगडे यांनी व्यक्त केल्या. शांताराम ढाकोळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.