Breaking news

Lonavala News : होऊ द्या चर्चा.. बोलघेवड्या योजनांची करुया भांडाफोड या कार्यक्रमाला लोणावळा शहरातून सुरुवात

लोणावळा : "केंद्र व राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा आणि फसव्या भुलथापांचंं पितळ उघडं पाडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू करण्यात आलेल्या भांडाफोड" या कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मा.आमदार अँड. गौतम चाबुकस्वार, कॉग्रेस आय महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कविश्वर, मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडी संघटिका शैलाताई खंडागळे, मा.नगराध्यक्षा उषा चौधरी, राजू गवळी, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

      यावेळी उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभुळकर, अनिल ओव्हाळ,अशोक निकम, कॉग्रेस आय लोणावळा शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिवसेना शहर संघटक सुभाष डेनकर, जितेंद्र कल्याणजी, बाबूभाई शेख, शिवसेना पदाधिकारी मारूती खोले, जयवंत दळवी, अमित कुंभार, यशवंत तुरडे, शंकर भेगडे, संजय भोईर, रामभाऊ थरकुडे, रविंद्र टाकळकर, रतन मराठे, उल्हास भांगरे, संजय शिंदे, विजय आखाडे, अशोक बोंद्रे, अनिल कडू, अक्षय साबळे, ओमकार फाटक, विवेक भांगरे, महिला आघाडी शहर संघटिका कल्पना आखाडे, मनिषा भांगरे, प्रिया पवार, अनिता गायकवाड, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, संजय जाधव, नितीन म्हसकर, कुणाल सपकाळ यांच्या सह शिवसेना शहराचे सर्व शहरप्रमुख, उपशहरप्रमुख  आजी माजी पदाधिकारी नगरसेवक, नगरसेविका महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व सर्व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     केंद्रातील व राज्यातील सरकार हे बोलघेवडे सरकार आहे. या सरकारच्या योजना कश्या फसव्या आहेत. हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.

इतर बातम्या