Breaking news

Kaivalyadham News : केंद्रीय माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली कैवल्यधाम शताब्दी महोत्सव नियोजनाची बैठक संपन्न

लोणावळा : आंतरराष्ट्रीय किर्तीची कैवल्यधाम योग संस्था 2024 साली शताब्दी महोत्सव साजरा करणार आहे. जगाला योगाचा संदेश व ज्ञान देणार्‍या या संस्थेचा शताब्दी महोत्सव (योग महोत्सव) कसा असावा याचे नियोजन करण्यासाठी केंद्रीय माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक 2 ऑक्टोबर रोजी लोणावळ्यातील कैवल्यधाम या संस्थेत पार पडली. सभेला कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी आणि इतर विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते. 2023-24 या शताब्दी वर्षात संस्थेचा शतक महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी काय योग्य नियोजन करता येईल याबद्दल सभेत सकारात्मक चर्चा करण्यात आली. सदर सभेचे आयोजन कैवल्यधाम योग संस्थेचे सचिव सुबोध तिवारी यांनी केले होते. स्वामी कुवलयानंद यांनी 1924 साली स्थापन केलेली लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्था 2024 साली आपली शतकपूर्ती करीत आहे. यासाठी संस्था 2023-24 साली आपले शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. शतकमहोत्सवाची रूपरेषा आखण्यासाठी कैवल्यधाम, लोणावळा "Centenial Year Celebration Orgnising Committee" यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती असे संस्थेचे सचिव सुबोध तिवारी यांनी सांगितले.

इतर बातम्या