Breaking news

नागरिकांसाठी महत्वाची बातमी : लोणावळा नगरपरिषदेच्या RRR उपक्रमांतर्गत नको असेल ते द्या… हवं असेल ते घेऊन जा…

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेने इंद्रायणी गार्डन येथे मेरी लाईफ मेरा स्‍वच्‍छ शहर या अभियानातंर्गत (रिडयुस, रियुज आणि रिसायकल - RRR) केंद्र इंद्रायणी गार्डन येथे सुरु केले आहे. या केंद्रात घरातील वापरण्‍यायोग्‍य जुन्‍या चपला, जुनी कपडे, जुनी भांडी, जुनी पुस्‍तके, जुनी खेळणी, इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू, (E - वेस्ट- मोबाईल, चार्जर, रेडियो, संगणक, ई.) वापरण्‍यायोग्‍य जुन्‍या वस्‍तू जमा करता येणार आहे. या केंद्राचे उद्घाटन आज करण्यात आले.

      अनेक वेळा घरामध्ये विविध प्रकारच्या जुन्या वस्तू ह्या अडगळीला पडून राहिलेले असतात या वस्तूंचे करायचे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला असतो लोणावळा नगरपरिषदेच्या आर आर या उपक्रमाद्वारे सदरच्या वस्तू भंगार मध्ये न टाकता त्या इंद्रायणी गार्डन येथील सदर केंद्रामध्ये जमा केल्यास घरातील एक प्रकारे साठवलेले जुने साहित्य व ई कचरा याची विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा होईल तसेच ज्यांना या वस्तूंची गरज आहे असे नागरिक त्यामधून हवे असलेल्या वस्तू घरी घेऊन जाऊन त्या पुन्हा वापरात आणू शकतात याकरिता जे नको असेल ते द्या व जे हवे असेल ते घेऊन जा अशी टॅगलाईन या उपक्रमाला देण्यात आली आहे तरी लोणावळा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा व आपले लोणावळा शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात मदत करावी असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे या केंद्राचे उद्घाटन लोणावळा नगर परिषदेच्या बांधकाम अभियंता वैशाली मठपती, प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी, पाणी पुरवठा अभियंता यशवंत मुंडे, आरोग्य विभागाचे दत्तात्रय सुतार, सुनिता पलंगे, स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे अक्षय पाटील, संजय जेधे, अशोक दळवी, शकिल शेख आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

   24 मे ते 5 जुन दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत नागरिकांना सदरचे साहित्य जमा करता येणार आहेत.

इतर बातम्या