Breaking news

दिड दिवसांच्या बाप्पांचे लोणावळा नगरपरिषदेच्या हौदात विसर्जन

लोणावळा : गणेशमूर्ती विसर्जनासाठी लोणावळा नगरपरिषदेने तयार केलेल्या कायमस्वरूपी हौदात दिड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. 

    10 सप्टेंबर रोजी घरोघरी बाप्पांचे आगमन झाले. भाविक भक्तांनी बाप्पांच्या स्वागतासाठी मोदक लाडवा प्रसाद व आकर्षक डेकोरेशन केले होते. दिड दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पांचे नुकतेच विसर्जन करण्यात आले. हे विसर्जन सर्व भाविकांनी लोणावळा नगरपरिषदेने तयार केलेल्या हौदात केले असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी दिली. पुजारी म्हणाले विसर्जन हौदावरील नियोजन पाहून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. तसेच अनेक वर्षानंतर स्वच्छ पाण्यात बाप्पांचे विसर्जन करता आले याबाबत समाधान व्यक्त केले.  

    गणेशमूर्ती विसर्जनासाठी लोणावळा नगरपरिषदेने इंद्रायणी घाटाच्या शेजारी हुडको वसाहत रोडवर कायमस्वरूपी हौदाची निर्मिती केली आहे. भक्तीभावाने आपण ज्या बाप्पांची पुजा अर्चा करतो, त्या बाप्पांचे विसर्जन स्वच्छ व निर्मळ पाण्यात व्हावे, याकरिता इंद्रायणी घाटावर हा हौद बांधण्यात आला आहे. या हौदावर दिड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. तसेच पाच दिवसांच्या घरगुती बाप्पांचे देखील विसर्जन याच हौदावर करण्यात यावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव व नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी केले आहे.

इतर बातम्या