Lonavala Good News : लोणावळ्यात हायड्रोलिक गाय रुग्णवाहिकेचे उद्घाटन; जखमी मोठया प्राण्यांना देणार सेवा

लोणावळा : लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाचे अध्यक्ष लायन ॲड. प्रफुल्ल लुंकड, जैन जीवदया फाउंडेशन लोणावळ्याच्या संस्थापक लायन दीपाली विरल गाला आणि वीरसेवक विशाल साखला यांनी लोणावळा भागातील सर्व मोठ्या प्राण्यांसाठी हायड्रोलिक गाय रुग्णवाहिकेचे उद्घाटन केले आहे. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमी प्राण्यांना वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. श्रीमती. उषाबेन बिधीन पंड्या, लोणावळा यांनी ही रुग्णवाहिका दान केली आहे. यासोबतच लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळ्याच्या ‘आपका दान किसिका वरदान’ या नव्या उपक्रमासाठीही हेच वाहन वापरले जाणार आहे.
लायन देवेंद्र नालेकर यांच्या मदतीने या वाहनाद्वारे लोकांच्या घरातून सर्व न वापरलेले साहित्य गोळा करून नंतर ते अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि मावळ तालुक्यातील दुर्गम गावातील गरजूंना वितरित केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मनसे शहर अध्यक्ष भारत चिकणे यांनी आवश्यक असेल तेव्हा सर्व मनुष्यबळ सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी श्रीमती उषाबेन पंड्या, स्वरगंधाचे सुनील कोपरकर, वीरसेवक विशाल साखला, मनसे शहराध्यक्ष भारत चिकणे, निखिल भोसले, रुग्णवाहिका चालक विपुल माने आणि लायन्स लोणावळा खंडाळा टीम - अध्यक्ष ॲड. प्रफुल्ल लुंकड, सचिव विरल गाला, खजिनदार प्रकाश जैन, डॉ. दिलीप सुराणा, डॉ. पी. एम. ओसवाल, डॉ. लीना पौन, देवल पारेख, वीरेंद्र पारख, अमित लुणावत, निमेश पारेख, मनोज लुंकड, संदीप कोराड, आशिष पौन, जुबेर शमशी, मंगेश कदम, अविव पारेख, संगीता लुंकड, चार्मी पारेख, कांता ओसवाल, जयश्री सुराणा, अश्विनी कदम, दीपाली गाला आदी उपस्थित होते.
हेल्प लाईन क्रमांक - 9112006999 वर कॉल आल्यावर ही रुग्णवाहिका "वीरसेवक" गटाच्या सहकार्याने सर्व जखमी मोठ्या प्राण्यांसाठी सेवा देईल.