Breaking news

श्रीमंत नेहरू मित्र मंडळ : शिवसेवा प्रतिष्ठानच्या संस्कार शिबिरातील मुलांचे गणपती अथर्वशीर्ष पठण

लोणावळा : येथील श्रीमंत नेहरू मित्र मंडळ ट्रस्टचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून मंडळाच्या वतीने बाप्पां करिता वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या बाप्पांसमोर आज लोणावळा येथील शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या संस्कार शिबिरातील लहान मुलांनी गणपती अथर्वशीर्ष पठण केले. 

     पन्नास वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या श्रीमंत नेहरू मित्र मंडळ ट्रस्टचे यंदाचे 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने मंडळाच्या वतीने भरघोस असे सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर दिला आहे. सोबतच लोणावळा शहरातील स्थानिक कलाकारांना देखील वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. आज लहान मुलांचे अथर्वशीर्ष पठण झाले. रविवारी 24 सप्टेंबर रोजी श्रीमंत नेहरू मित्र मंडळ ट्रस्ट व सुखकर्ता फाउंडेशन यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत त्वचारोग तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासह गरजवंत नागरिकांना एक महिन्याचा किराणा मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षीच भव्य दिव्य देखावे सादर केले जातात. यावर्षी गणेश भक्तांना गणपती बाप्पांच्या दर्शनासोबत काशी विश्वनाथ मंदिराचे देखील दर्शन होणार आहे. अतिशय भव्य स्वरूपामध्ये हे मंदिर तयार करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे मंडळाच्या वतीने संकल्प नशा मुक्ती अभियानाची जनजागृती उत्सव स्थळाच्या ठिकाणी करण्यात आली आहे.

इतर बातम्या