Lonavala Medical camp l लोणावळ्यात 45 मुलांची मोफत आरोग्य तपासणी; एसआरसीसी व रोटरी क्लबचा उपक्रम

लोणावळा : एसआरसीसी (SRCC) मुंबई व रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने लोणावळ्यात असामान्य लहान मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 19 जानेवारी रोजी केले होते. त्यामध्ये 45 जणांची मोफत तपासणी करण्यात आली.
एसआरसीसी च्या संचालिका डॉ. शिवांगी पुरंदरे यांच्या पुढाकाराने हे शिबीर लोणावळ्यातील प्रियदर्शनी संकुल येथील शिवदुर्ग मित्रच्या हॉल मध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात मुंबईहून आलेल्या SRCC च्या प्रत्येक गोष्टीमधील तज्ञ डॉक्टरांकडून लहान मुलांच्या बाबतीतील पुढील लक्षणांची तपासणी करून पुढील उपचार सुचविण्यात आले.
यामध्ये चालण्यात असंतूलन, अवयवांचे विकार, स्नायुंचे विकार, हाडांना झालेली दुखापत, सेरेबल पाल्सी, पाठीच्या कण्याचे विकार, स्वमग्नता, अतिचंचलता, फिट / झटके येणे, शुद्ध हरपणे, स्नायुंचे आखडणे, शिक्षकण्यातील अक्षमता, अनुवांशिक विकार, भौतीक उपचार, स्पीच थेरपी, मानसशास्त्र व वर्तणूक थेरपी, व्हिजन थेरपी याचा समावेश होता.
या शिबिरासाठी शिवदुर्ग मित्रचे सुनिल गायकवाड, आनंद गावडे, उपाध्यक्ष महेश मसने, राजेंद्र कडू, अनिल सुतार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. रोटरी क्लब चे रो. आशिष मेहता, रो. ब्रिंदा गणात्रा व रो. जयवंत नलोदे हे उपस्थित होते. या शिबीरासाठी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी तसेच प्रकाश पाठारे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.